Site icon

यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

यावल तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला असून यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील महापुरुषांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना रविवारी (दि.16) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले. घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिक उप अधिक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर गावातील तणावपूर्ण वातावरण निवळले आहे. तर सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, राकेश मानगावकर, पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत

जळगाव : तणावपूर्ण वातावरण शांत करताना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
रविवारी (दि.16) सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकीसमोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले.

पाच जणांना घेतले ताब्यात
याप्रसंगी सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचेसह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा:

The post यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता यावल तालुक्यात जयंती फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता appeared first on पुढारी.

Exit mobile version