रामनवमी 2023 : वणीच्या राममठात रामजन्मोत्सव

वणी रामनवमी www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य उदासी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वरूप श्रीराम मंदीर मठात श्री रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील राममंदीरात गेल्या अनेक वर्षाःपासून उत्सव साजरा करण्याची पूर्वापारपासून परंपरा आहे. त्यास अनुसरुन श्रीराम मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. आकर्षक रांगोळी, फुलांचे सुशोभिकरणाने सजावट करण्यात आली. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सितामाई व हनुमान यांच्या मूर्तींना आकर्षक असा पेहराव करण्यात आला होता. संगमरवरीच्या मूर्तींचे मनमोहक स्वरुपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदीरात गर्दी केली. रामजन्मोत्सवानिमीत्ताने महाराष्ट्रातील अग्रमानांकीत किर्तनकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.30) रामनवमीदिनी दुपारी बाराच्या सुमारास रामजन्मोत्सव साजरा झाला. सुशोभीत पाळण्यात प्रतिकात्मक मूर्ती ठेवल्यानंतर महीला भाविकांनी पाळणागीत गायले. पाळणा हलवून भाविकांनी दर्शन घेतले. तसेच सोमवारी (दि.3) सुशोभीत अशा पालखीत श्रारीम व हनुमानाची मूर्ती ठेवून शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुक काढण्यात येणार आहे. एकादशीला राम सितेच्या विवाहाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती मठाधिपती विनायक चन्द्रात्रे व प्रद्युम्न चन्द्रात्रे यांनी दिली. परिसरातील व पंचक्रोशीतील भाविकांनी रामजन्मोत्सवास हजेरी लावली.

हेही वाचा:

The post रामनवमी 2023 : वणीच्या राममठात रामजन्मोत्सव appeared first on पुढारी.