रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे : भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस लवकरच दररोज होणार

रेल्वे प्रवास

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नरडाणा रेल्वे स्टेशनवर मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तसेच भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वेगाडी दररोज व्हावी. अशी मागणी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची जालना येथे भेट घेवुन निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

अहमदाबाद हावड़ा एक्सप्रेस, नवजीवन चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस, ताप्तीगंगा सुरत पटना एक्सप्रेस, पुरी अहमदाबाद एक्सप्रेस, भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करण्यात यावी व सुरत अमरावती सुपर फास्ट दररोज करण्यात यावी. तसेच नरडाणा येथे या गाडीला थांबा मिळावा, बोराणी अहमदाबाद एक्सप्रेस गाडीला नरडाणा येथे थांबा मिळावा. अशी मागणीचे निवेदन रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना दिले आहे. यावेळी सोबत नरडाणा परिसरातील रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य रविंद्र वाघ , कुणाल जाधव आदि उपस्थित होते. यावर रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी आश्वासन दिले की, लवकरच भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करण्यात येणार आहे.

सुरत भुसावळ (प.रे.) वरील महत्वपूर्ण असलेल्या नरडाणा रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण करून प्लॅटफार्म करण्यात आले आहे. येथून जवळपास २० हून अधिक मेल एक्सप्रेस जातात. या रेल्वे गाड्यांना नरडाणा स्टेशनवर थांबा नसल्यामुळे प्रवाश्यांना लाभ न मिळाल्याने परिसरातील ३५ गावातील प्रवाश्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. मनमाड-धुळे-इन्दौर रेल्वे मार्गाचे जंक्शन म्हणुन नरडाणा स्टेशन होणार आहे. तरी देखील या स्टेशनवर मेल एक्सप्रेस रेल्वेला येथे थांबा नसल्यामुळे गैरसोय होत असल्याची भूमिका मांडण्यात आली.

हेही वाचा:

The post रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे : भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस लवकरच दररोज होणार appeared first on पुढारी.