Site icon

लक्ष दिव्यांची आरास : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाकाठी रंगला दीपोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यंदा वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा एकाच दिवशी सोमवारी (दि. 7) आले. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणार्‍या त्रिपूर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून लोक या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात दिवे लावून आनंदोत्सव साजरा करतात.

 

त्रिपुरी पौर्णिमा

 

 

 

सोमवारीदेखील भाविकांनी गोदाघाट परिसरात दीपोत्सवासह दीपदान, गंगास्नानासाठी गर्दी केली होती. विशेषत: महिला भाविकांनी मंदिरांबाहेर दीप उजळविल्याने रामकुंड परिसर उजळून निघाला होता. (छायाचित्रे : रुद्र फोटो)

 

गंगापूर रोडवरील ‘प्रतितिरुपती बालाजी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी दीप प्रज्वलित करताना महिला भाविक. .(छाया : हेमंत घोरपडे)

The post लक्ष दिव्यांची आरास : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाकाठी रंगला दीपोत्सव appeared first on पुढारी.

Exit mobile version