Site icon

लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील लोणकर मळ्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरातील मळे वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याचप्रमाणे येथील एका पादचारी नागरिकांवर बिबट्याने जीवघेणा हल्लादेखील केला होता. (Nashik Leopard)

नाशिकरोड परिसर तसेच लगतच्या खेडेगावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनादेखील वारंवार घडताना दिसत आहेत. दारणा नदीकाठच्या गावांना तसेच जय भवानी रोड परिसरातील मळे वसाहतींमधील नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असते. बिबट्याच्या दर्शनामुळे येथील नागरिक भयभीत झालेले आहेत. अनेक ठिकाणी वन विभागाने पिंजरादेखील लावला आहे. मात्र बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनविभाग तसेच स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे. 

लोणकर मळा येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. याठिकाणी नागरिकांच्या मागणीवरून वनविभागाने पिंजरा लावला आहे. पिंजऱ्यामध्ये बिबट्याला भक्ष्य देखील ठेवण्यात आले आहे. या पिंजऱ्यात लवकरात लवकर बिबट्या जेरबंद व्हावा, अशी अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केली.

हेही वाचा :

The post लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत appeared first on पुढारी.

Exit mobile version