Site icon

शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिकमध्ये ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या 11 माजी नगसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर संजय राऊत चांगलेच संतापले. जे शिंदे गटात गेले, ते सर्व दलाल आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

जे शिंदे गटात गेले आहेत, ते मूळात आधीच गेले होते, त्यातल्या तीन लोकांची तर आम्ही आधीच हकालपट्टी केली होती. जे शिंदे गटात गेले आहेत, त्यात जमीनीचे व्यवहार करणारे आहेत, त्यातल्या अनेकांचे दोन नंबरचे धंदे आहेत. त्यांच्यावर दबाव आणून त्यांना प्रवेश करायला भाग पाडले जात आहे. जे गेले त्यांचा विचार, पक्षनिष्ठा याच्याशी काही संबंध नाही. त्यांचा व्यवसाय केवळ दलाली करणे हा आहे.  मंत्रालयात दलाली करणे, ठेकेदारी करणे, ज्याचं सरकार येईल त्यांच्यासोबत जाणे हेच त्यांचे काम आहे.  ज्यादिवशी सरकार पडेल त्या दिवशी हे लोक पुन्हा आमच्या दारात उभे राहतील असे राऊत म्हणाले.

सिल्वर ओकचे दलाल कोण सगळ्या महाराष्ट्राला माहित

संजय राऊत यांनी दलाल संबोधल्या नंतर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांनी राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला काहीजण दलाल म्हणाताय, पण सिल्वर ओकचे दलाल कोण आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहित असल्याची टीका बोरस्ते यांनी केली आहे. आम्हाला कोणाबद्दल बोलत नाही, पण तोंड उघडण्यास लावू नका असा इशारा अजय बोरस्ते यांनी यावेळी दिला.

The post शिंदे गटात गेले ते सर्व दलाल, 2024 ला पुन्हा आमच्या दारात येतील तेव्हा आम्ही... appeared first on पुढारी.

Exit mobile version