शिरपूर बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील तर उपसभापती लक्ष्मीकांत पाटील

शिरपूर बाजार समिती,www.pudhari.news

 धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील व उपसभापती लक्ष्मीकांत पाटील यांची निवड करण्यात आली. या बाजार समितीवर माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान झाले आणि लगेच त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात आला होता. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक लढविण्यात आली होती. या निवडणुकीत आमदार अमरिशभाई पटेल यांच्या पॅनेलने सर्व १८ जागांवर एकतर्फी दणदणीत विजय मिळवला होता. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या गेल्या 35 वर्षांच्या राजकीय नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला असून तालुक्यातील सर्वच संस्थांवर त्यांनी निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.

दरम्यान सर्व संचालकांची जनक विला निवासस्थान आमदार कार्यालयात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी  बैठक घेऊन सभापती पदासाठी के. डी. पाटील व उपसभापती पदासाठी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड जाहीर केली. यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, सर्व संचालक उपस्थित होते. यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून सभापती आणि उपसभापती यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार अमरिशभाई पटेल यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सर्व संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विशेष लेखा परीक्षक व्ही. बी. पापूलकर हे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल ऐंडाईत यांनी कामकाज पाहिले.

यावेळी नवनिर्वाचित सभापती पाटील कांतीलाल दगा (के. डी. पाटील), उपसभापती लक्ष्मीकांत बापुराव पाटील, गुजराथी किरण बद्रीनाथ, जमादार शांतीलाल इंद्रसिंग, पाटील अरविंददास आनंदा, पाटील चंदू धोंडू, पाटील शिवाजी धनगर, महाजन विठोबा सिताराम, पाटील मेघा राजेंद्र, मराठे मनीषा राजकपूर, पाटील प्रसाद मोहन, पावरा कृष्णा गेंदराम, राऊळ आनंदसिंग दर्यावसिंग, पावरा जगन सुपा, बोरसे मिलींद दौलतराव, अग्रवाल अर्पित घनशाम, जैन सतिष दगडूलाल, उपस्थित होते.

हेही वाचा :

The post शिरपूर बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील तर उपसभापती लक्ष्मीकांत पाटील appeared first on पुढारी.