सप्तशृंगी गडावर अद्याप ड्रेसकोडबाबत निर्णय नाही : व्यवस्थापक दहातोंडे यांची माहिती

नाशिक सप्तशृंगगड प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य मंदिर परिषदेने राज्यातील विविध मंदिरामध्ये वस्ञसंहिता कार्यान्वित  करण्या बाबतचा निर्णय घेतला असला तरी श्रीक्षेञ सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टने अद्याप त्यासंदर्भात कुठलाही अधिकृत निर्णय घेतला नसल्याची माहिती देवी संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे.

सप्तशृंगी देवीच्या मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर याबाबत व्यवस्थापक दहातोंडे यांनी याबाबात स्पष्टीकरण दिले आहे. ड्रेस कोडच्या विषयाबाबत अघाप कुठल्याही प्रकाराचा अधिकृत निर्णय झाला नाही. भाविष्याकाळात संबधित निर्णय घेताना विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ व भाविकांना सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. अद्याप विश्वस्त कार्यकारिणीची बैठक झालेली नाही, त्याबाबत ठराव झाला नाही, त्यामुळे हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे हहातोंडे म्हणाले.

सप्तशृंगी देवीच्या मंदिरात ड्रेस कोड लागू झाल्याची बातमी प्रसारित होत आहे.  पण याबाबत अघाप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केेलेली नाही. त्यामुळे याबाबत निर्णय झाल्यावर सदरचे विषय मार्गी लागेल. याबाबत योग्य निर्णय लवकर घेण्यात यावा.

प्रकाश कडवे, भाजप अध्यक्ष सप्तशृंगड

हेही वाचा :

The post सप्तशृंगी गडावर अद्याप ड्रेसकोडबाबत निर्णय नाही : व्यवस्थापक दहातोंडे यांची माहिती appeared first on पुढारी.