सिन्नर एमआयडीसी : 380 एकर जागा उद्योजकांना वितरित करा

उद्योगमंत्री सामंत www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर एमआयडीसी (सिमा) मध्ये संपादित केलेल्या 380 एकर जागेवर सोयीसुविधा निर्माण करून ती जागा उद्योजकांना वितरित करावी, अशी मागणी ‘सिमा’ या उद्योजक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान ‘सिमा’च्या पदाधिकार्‍यांनी उद्योगमंत्र्यांची बैठक घेऊन सिन्नर एमआयडीसीच्या विविध प्रश्नी निवेदन दिले. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या. यावेळी संघटनेचे सचिव बबन वाजे यांनी सिन्नर एमआयडीसीतील विविध प्रश्न मांडले. त्यामध्ये एमआयडीसीतील मुख्य रस्त्याच्या फोर लेनचे काँक्रिटीकरण करणे, उद्योजकांना 380 एकर जागा वितरित करणे, एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापन व उचलणे याबाबतचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावा, असे निर्देश देणे, माफरवाडी येथील आरक्षित केलेल्या एक हजार एकर क्षेत्रावर भूसंपादन करून त्यावर सोयी-सुविधा तयार करून उद्योजकांना वितरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मुकुंद लि. 42 क्षेत्रात प्लॉट पाडून ते उद्योजकांना वितरित करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ‘सिमा’चे अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष किरण भंडारी, रतन पडवळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post सिन्नर एमआयडीसी : 380 एकर जागा उद्योजकांना वितरित करा appeared first on पुढारी.