सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली

सिडको, पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वी सिन्नर-नाशिक मार्गावर शिंदे टोल जवळ बस जळाली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी (दि.११) मुंबई-आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली होती. अग्नीशामक दलाने ही आग विझविली आहे. आगीत कंटेनरचा पुढील भाग आणि कॅबीन जळून खाक झाली.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला सिडकोतील अश्विननगर येथे रविवारी (दि.११) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. चालकाने कंटेनरला आग लागताच रस्त्याच्या बाजुला कंटेनर लाऊन कॅबीन मधून बाहेर उडी मारली.

दरम्यान, अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अग्निशामकचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आग विझविली. अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी डिझेल टँक वाचविल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत कंटेनरचा पुढील भाग व कॅबीन जळून खाक झाले. बॅटरी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का?

The post सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली appeared first on पुढारी.