सुधीर तांबेंना पुत्रासाठी उमेदवारी हवी होती तर त्यांनी तसं सांगायला हवं होतं : नाना पटोले

नाना पटोले, सुधीर तांबे,www.p0udhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आम्ही पक्षातर्फे निवडणुकीआधीच सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना पुत्रासाठी उमेदवारी पाहिजे होती तर त्यांनी तसे सांगितले पाहिजे होते. मात्र त्यांनी तसे काही सांगितले नाही. पक्षातर्फे आम्ही दाेन कोरे एबी फॉर्मही पाठवले होते. उमेदवारीचा वाद त्यांचा कौटुंबिक विषय आहे. आमच्यासाठी हा विषय संपला असून आता आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करीत असल्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी सांगितले.

नाशिकमध्ये कॉग्रेस कमिटीत आयोजित कार्यक्रमानंतर पटोले बोलत होते. पदवीधर मतदार निवडणुकीसाठी मी पक्षाचे दोन कोरे एबी फाॅर्म पाठवले होते. धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती. मात्र तांबे पिता पुत्रांच्या कौटुंबिक विषयामुळे त्यांनी पक्षाचा अर्ज भरला नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले.

मी म्हणजे पक्ष नाही. पक्ष कोणाच्या घरचा नसतो तर कार्यकर्त्यांचा असतो. जो पक्षादेश मानणार नाही त्यास जागा दाखवून देऊ असा इशाराही पटोले यांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या प्रश्नांवर न बोलता स्वत:च्या प्रश्नांवर बोलतात. त्यांनी स्वत:पेक्षा जनतेची काळजी करावी, असा टोलाही आ. पटोले यांनी लगावला. महाराष्ट्रातील प्रकल्प, घरकुल योजना, संग्रहालयातील प्राणी गुजरात राज्यात नेले जात असल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना आ. पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला लुटून महाराष्ट्राला द्यायचे. आता भाजपा महाराष्ट्राला लुटून सुरतेला वाटत आहेत.

हेही वाचा : 

The post सुधीर तांबेंना पुत्रासाठी उमेदवारी हवी होती तर त्यांनी तसं सांगायला हवं होतं : नाना पटोले appeared first on पुढारी.