16 वर्षीय अप्लवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जामनेर तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची घटना एका खेडेगावात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलीवर या पीडितेवर संशयित आरोपीने गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने पहूर पोलिस स्थानक गाठत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित जगदीश पवार याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.

हेही वाचा 

ऊस वाहतूकदार आणि ट्रॅक्टर चालकांना खास वॉर्निंग ! काष्टीतील हटके बॅनरची सर्वत्र चर्चा  

पिंपरी : वायसीएममध्ये पीएम केअरचे 45 व्हेंटिलेटर नादुरुस्त 

Jeff Bezos | टीव्ही, कार, फ्रीज खरेदी करु नका, आर्थिक मंदी येतेय, अब्जाधीश जेफ बेझोस यांचा सल्ला 

The post 16 वर्षीय अप्लवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार appeared first on पुढारी.