सिडको (नाशिक) : सिडकोच्या प्रभाग क्रमांक २७, २८ व २९ मधील पाणीपुरवठा काही दिवसांपासून विस्कळीत झाला असून यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी न मिळणे तसेच कमी दाबाने पाणी मिळणे अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे. त्याचे निवारण होत नसल्याचे निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे - दराडे व पती बाळा दराडे यांनी नागरिकांसह पाथर्डी फाट्या जवळील जलकुंभावर चढून निषेध नोंदविला.
सिडको : प्रभाग क्रमांक २७, २८ व २९ मधील पाणीपुरवठा काही दिवसांपासून विस्कळीत झाला असून यामुळे विविध प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे. या निषेधार्थ शिवसेना नगरसेविका किरण गामणे-दराडे व पती बाळा दराडे यांनी नागरिकांसह पाथर्डी फाटा जवळील जलकुंभावर चढून निषेध नोंदविला. pic.twitter.com/AZUMQpXqb5
— Sakal Nashik (@SakalNashik) December 7, 2020