‘परदेशात नोकरी लावून देतो’ म्हणत लावला हजारोंचा चुना; पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : परदेशात नोकरी लावून देतो, म्हणत थोडेथिडके नव्हे तर तब्बल ८७ हजारांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

पिंपळगाव येथील तरुण ऋषिकेश जाधव यास वडाळा ( मुंबई) येथील खासगी कंपनीने नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला. परदेशात नोकरी व व्हिसा काढून देण्याचे आमिष १० मे २०१९ रोजी वडाळा मुंबई येथील खासगी कंपनी असलेली किंग्स ऑफ ग्रुपकडून दाखविण्यात आले. त्यानुसार ८७ हजार रुपये ऑनलाइन गूगल पेच्या माध्यमातून हृषिकेश जाधव यांनी कंपनीला दिले. मात्र अद्यापपर्यंत नोकरी न लागल्याने ऋषिकेशला आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समजले.

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात संबंधित कंपनीचे आशिष थोरात (रा.सायन, कोळीवाडा, वडाळा, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन करत आहेत.

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका