“नाशिकमध्ये पुण्यातील ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती होणे शक्य नाही” वन्यप्राणी दिसल्यास संचारबंदी

नाशिक : पुणे शहरात बुधवारी एक गवा चुकुन मानवी वस्तीत शिरला होता. नागरिकांच्या जमावाने त्याचा पाठलाग करुन हाकलल्याने सलग पाच सहा तास धावल्याने या गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी घटना नाशिक शहरात होऊ देणार नाही, असा निर्धार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये वन्यप्राणी दिसल्यास संचारबंदी
पुणे शहरात बुधवारी एक गवा चुकुन मानवी वस्तीत शिरला होता. नागरिकांच्या जमावाने त्याचा पाठलाग करुन हाकलल्याने सलग पाच सहा तास धावल्याने या गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी घटना नाशिक शहरात होऊ देणार नाही, असा निर्धार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, एखादा प्राणी चुकून ज्या वेळेला मानवी वस्तीत घुसतो त्या वेळेला नागरिकांचे वर्तन संयमाचे व शहानपणाचे असले पाहिजे. असा प्रसंग नाशिक जिल्ह्यात घडल्यास त्या क्षेत्रात तातडीने संचारबंदी जाहीर करुन केवळ वनविभागाचे लोक, पालिस आणि त्या क्षेत्रातील तज्ञ यांनाच तो प्राणी पकडण्याची मुभा दिली जाईल. याबाबत सर्व नागरिकांचे आधीच प्रबोधन करणे सुद्धा गरजेचे आहे.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

वन विभाग तसेच पोलिसांनाही त्यावर उपाययोजना करणे अवघड

यापूर्वी नाशिक शहरात अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत. शहरात यापूर्वी पाथर्डी गावाच्या हद्दीत एक गवा आढळला होता. बिबट्यांचा वावर नियमित असतो. अनेकदा थेट मानवी वस्तीत बिबट्याचा वावर आढळला आहे. त्यात अनेकदा त्याची बातमी कळताच परिसरातील नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे वन विभाग तसेच पोलिसांनाही त्यावर उपाययोजना करणे अवघड होऊन बसते. त्यात नागरिकांवर देखील हल्ले झालेले आहेत. त्यामुळे  मांढरे यांनी पुणे येथील गवा आढळल्याच्या व त्यानंतर त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जाहिर केलेली भूमिका वन्यप्राणी तसेच नागरिक व प्रशासनाच्याही सोयीची आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले