जलसंपदामंत्री म्हणाले, ‘राजकीय मतभेद विसरुन विकासासाठी एकत्र या!’

नाशिक : राजकीय मतभेद, पक्षभेद विसरुन विकासासाठी एकत्र या विकासाला पाठिंबा द्या. असे आवाहन जलसंपदामंत्री जयवंतराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) श्रीभुवन येथे आयोजित जलसिंचन बैठकीत केले.

शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार

यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. तालुक्यात 2500 मिमीपेक्षा जास्त पाऊस या भागात पडतो. मात्र पश्चिमी वाहिन्या नद्यांद्वारे हे पाणी गुजरातमार्गे अरबी समुद्रात वाहून जाते. हे पाणी या भागात लहान साठवण बंधारे बांधून पावसाळ्यात पडणारे पाणी हे पुर्वेकडील गोदावरी खोऱ्यात व तापीच्या खो-यात वळवून पाण्याचा सदुपयोग करण्यासाठी या वळण योजना उपयोगी ठरतील. स्थानिक आदिवासी बांधवांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच तालुक्यात जलसिंचन योजना तयार करुन पाणी देण्यात येणार आहे. तालुक्यातील जलसंधारण विभागाचे साठवण बंधारे जलसिंचनकडे वर्ग करुन योजना राबविण्यात येतील. आधी स्थानिक लोकांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल.

तर मतदार संघाचे चित्र बदलणार

सुरगाणा तालुक्यात कै.ए.टी. पवार यांनी आदिवासी भागात अनेक सिंचन प्रकल्प बांधून आदिवासींच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. हेच वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून चिरंजीव नितीन पवार हे सिंचना योजना करीता लढा देत आहेत. तालुक्यात पाणी नसल्यामुळे 85 हजार मजुर, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरीवर्ग रोजगाराकरीता बाहेर जात आहेत. हे स्थलांतर व शेतक-यांची दैना दुर करुन शेतीवर आधारित व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येतील. येथील महिलांना पाणी आणण्यासाठी रात्री अपरात्री दुरवर जावे लागते. या साठवण योजनांमुळे नळपाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा उपलब्ध झाल्यास मतदार संघाचे चित्र बदलणार असून विकासाला गती मिळणार आहे. पुरोगामी विचारांना जे.पी. गावित यांच्या धर्मनिरपेक्ष विंचारांचा नेहमीच पाठींबा असतो तो या कामात नितीन पवार यांना पाठिंबा मिळणारच असल्याने त्यांनी नमूद केले.

नरहरी झिरवाळ म्हणाले...

येथील शेतकरी नागलीची शेती करतो. कोरडवाहू शेतीसाठी वर्षभर कष्ट करतो. मात्र पदरात काहीच पडत नाही. तालुक्यात भरपूर पाऊस पडूनही अंघोळीला पाणी मिळत नाही. पाणी भरण्यासाठी जाणारी महिला पिण्यासाठी सोबत पिण्यासाठी पाणी घेऊन जाते. तालुक्यात सरकारी कर्मचारी येण्यास नाखूश असतात तालुक्यात बदली झालेल्या कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगतोय असे म्हटले जाते. हा गैरसमज दुर करायला पाहिजे. पिंपळगाव भागातील द्राक्षे बागा ह्या आदिवासी बांधवच पिकवतात हे विसरता कामा नये. असे ते म्हणाले.

यावेळी आमदार नितीन पवार म्हणाले...

सुरगाणा तालुक्यात पाणी प्रश्न हा गंभीर असून येथील शेती केवळ कोरडवाहू असून पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मजुरीकरीता हजारो मजुरांचे स्थलांतर होते. या तालुक्याकरीता लहान, मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे मंजूर करावेत. कोणत्याही गावात गले की पाणीच मागितले जाते. जिल्ह्य़ात सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर हा सर्वात जास्त आहे. त्यामुळे एकच विनंती करतो की मंत्री महोदयांनी सुरगाणा तालुक्याला दत्तक घेऊन विकास करावा अशी यावेळी खुंटविहीर येथील आनंदा झिरवाळ यांनी मालगोंदा येथील लपाकडे प्रस्तावित असलेली लघुसिंचन योजना तात्काळ मंजूर करुन काम सुरु करावे.

सभामंडपातील उपस्थितांमध्ये एकच चर्चा

यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सुवर्णा गांगोडे यांनी माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्या समक्ष माकपला सोडचिठ्ठी देत हाताला घड्याळ बांधले. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने सभामंडपातील उपस्थितां मध्ये एकच चर्चा सुरू झाली होती.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, विक्रमगडचे आमदार सुनिल भुसारा, माजी आमदार जयंत जाधव, जिवा पांडू गावित, माजी खासदार समीर भुजबळ, जि.प. सदस्या जयश्री पवार, आदिवासी सेवक चिंतामण गावित, मोतीराम गावित, हेमंत पाटील, श्रीराम शेटय़े, यशवंत राऊत बाबा, माकपच्या पंचायत समिती सदस्या सुवर्णा गांगुर्डे, कोकण पाटबंधारे विभागाचे अधिकारी घुगरे, नाईक, जलसिंचन विभागाचे सचिव एन.बी.शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला