दुर्दैवी! आई घरात येण्यापूर्वीच सातवीत शिकणाऱ्या ‘प्रज्योत’चा खेळ संपला; मातेने फोडला हंबरडा

​​सिन्नर (जि.नाशिक) : प्रज्योत दुपारी मैदानावर क्रिकेट खेळून आल्यावर, त्याने ऑनलाइन अभ्यासही केला. त्यानंतर आई घराबाहेर बसलेली असताना, त्याने मुख्य खोलीचा सेफ्टी डोअर आतून बंद केला. बराच वेळ त्याचा आवाज न आल्याने आईने त्याची चौकशी केली असता, ही घटना उघडकीस आली.

ऑनलाइन अभ्यासाच्या तणाव कि आणखी काही?

प्रज्योत दुपारी मैदानावर क्रिकेट खेळून आल्यावर, त्याने ऑनलाइन अभ्यासही केला. त्यानंतर आई घराबाहेर बसलेली असताना, त्याने मुख्य खोलीचा सेफ्टी डोअर आतून बंद केला आणि गळफास घेतला. बराच वेळ त्याचा आवाज न आल्याने आईने त्याची चौकशी केली असता, ही घटना उघडकीस आली.ऑनलाइन अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केली, की वायरसोबत एखादा खेळ खेळताना चुकून गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला, याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. सिन्नरमधील सारडा विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रज्योतच्या मृत्यूची सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी प्रज्योतच्या मृतदेहावर त्याचे मुळगाव जोपूळ (ता. चांदवड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

नेमके कारण समजू शकले नाही

शहरातील कानडी मळा भागात प्रज्योत जाधव (वय १२) या सातवीत शिकणाऱ्या मुलाचा वायरचा गळफास बसल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१०) सायंकाळी घडली. शहरातील कानडी मळा भागात प्रज्योत जाधव (वय १२) या सातवीत शिकणाऱ्या मुलाचा वायरचा गळफास बसल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. प्रज्योतने आत्महत्या केली, की खेळताना चुकून वायरचा गळफास बसून त्याचा मृत्यू झाला, याबाबत नेमके कारण समजू शकले नाही.

सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रज्योत जाधव हा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत गुरुवारी आढळून आला. घराचे सेफ्टी डोअर बंद करून आतील मुख्य दरवाजाच्या कडी कोयंड्याला बांधलेली वायर दरवाजावरून खाली घेत या वायरीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आल्याची माहिती तपासाधिकारी निरगुडे यांनी दिली.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

 

 

दुर्दैवी! आई घरात येण्यापूर्वीच सातवीत शिकणाऱ्या 'प्रज्योत'चा खेळ संपला; मातेने फोडला हंबरडा