सिडको (जि.नाशिक) : राजकारणाबरोबर आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यानी व्यंगचित्राच्या माध्यमातून अनेकांना घायाळ करणाऱ्यांपैकी एक नाव राज ठाकरे यांचे घेतल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्या या विविध शैलीतील पैलूंची ठेव आपल्या "चित्ररूपी पुस्तका" तून साकारण्याचे काम नाशिक मधील एक अवलिया असलेेला "रंगछटाकार" विनोद सोनवणे या तरुण चित्रकाराने केली आहे. त्यांना सध्या राज ठाकरे यांच्या भेटीची आस लागली आहे. त्यांच्या या ठाकरे प्रेमातून तुकारामांच्या पुढील चार ओळी आठवल्या शिवाय राहणार नाही.
"भेटीलागी जीवा लागलीसे आस पाहे रात्री दिवस वाट तुझी"
अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेले विनोद सोनवणे हे मुळचे धुळे जिल्ह्यातील आहे. आपले चित्रकलेतील शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी आपल्या डोळ्यासमोर राज ठाकरे यांना चित्रकलेतील गुरु मानले. याच चित्ररुपी प्रेमातून विनोद यांनी नऊ वर्षापूर्वी राज ठाकरे यांना एक चित्र भेट दिले होते.
तब्बल नऊ वर्षानंतर त्यांचे राज ठाकरे यांच्यावरील प्रेम काही करता कमी झालेले दिसत नाही. कोरोनाच्या फावल्या वेळात राज ठाकरे यांच्या विविध पैलूंचे चित्ररूपी पुस्तक सोनवणे यांनी साकारले असून हे पुस्तक श्री ठाकरे यांना सप्रेम भेट करायचे आहे. परंतु राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचणे म्हणजे एक खडतर प्रवास समजला जातो. भेटीकरिता ते प्रयत्नशील असून राज ठाकरे यांच्या भेटीची सोनवणे यांना आस लागली आहे.
हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO
विनोद सोनवणे यांचे कार्य
- स्टॅन्ड अप मिमिक्री आर्टिस्ट
-३६० पुरस्कारांचा मानकरी
- २५००० मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण
- वृत्तपत्र चिटकवून १५ फुटी चित्र बनवण्याची कला
हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न
चित्र भेट देणाऱ्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे
*राजकारणात :
राज ठाकरे, छगन भुजबळ, विनायक दादा पाटील
*समाजकारणात :
अण्णा हजारे, सिंधुताई सपकाळ, किरण बेदी
*चित्रपट सृष्टीत :
नाना पाटेकर, मोहन जोशी, मोहन आगाशे, अशोक सराफ, महेश मांजरेकर, सचिन खेडकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमोल कोल्हे, प्रशांत दामले