31 मार्चपर्यंत महापालिका हद्दीतील सर्व शाळा बंद; महापालिका आयुक्तांचा निर्णय

नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10वी,12वी मात्र पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार असल्याचे नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. 

कोरोना स्प्रेडरवर होणार कारवाई

होम आयसोलेशन मधील बाहेर फिरणारे सुपर स्प्रेडर असून त्यांच्यामुळे रुग्ण वाढण्याची भिती आहे. तसेच त्यांना शोधुन जबरदस्ती पालिका रुग्णालयात दाखल करणार असल्याचे आयुक्त म्हणाले. आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल करणार असल्याचे म्हणाले.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

रिपोर्ट्सची तपासणी

15 दिवसात,पालिकेची बिटको रुग्णालयात, सॅम्पल टेस्टिंग लॅब तसेच दररोज 2 हजार सॅम्पल तपासणी होणार असल्याचे सांगितले. नोडल अधिकाऱ्यांकडून खाजगी लॅब्जकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सची तपासणी करण्यात येणार आहे.

प्रादुर्भाव वाढणाऱ्या देशातील 10 शहरात नाशिक कॉमन
कोरोना पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव वाढणाऱ्या देशातील 10 शहरात नाशिक कॉमन असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. नाशिककर गंभीर नाही हे दुर्दैव असून बंधनं न पाळणाऱ्या नागरिकांवर आता कडक कारवाई होणार आहे. होम आयसोलेशन न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असून अनेक आरोग्य पथकांची विशेष निर्मिती करण्यात येणार तसेच खबरदारी म्हणून शहरात कमांड कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार असल्याचा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. बंधन न पाळणाऱ्या नागरिकांसोबत,शिस्त न पाळता चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

व्हॅक्सीनचा 5 हजार डोसचा साठा आज प्राप्त; आयुक्तांची माहिती

- सरकारी रुग्णालयात,3284,327रुग्ण उपचार घेताय, 2957 शिल्लक
- ICU आणी व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध
- शहरात 533 प्रतिबंधक क्षेत्र
- व्हॅक्सीनचा 5 हजार डोसचा साठा आज प्राप्त
- 50 हजार डोस, सरकारकडे मागितले आहे
- निर्बंध न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर पालिका प्रशासन आणी पोलीस संयुक्त कारवाई करतील