६५ वर्षांपासून हिंदु परंपरा जपणारे शेख कुटुंब! आजही ‘तो’ वारसा कायम

ओझर (जि.नाशिक) : हिंदू धर्माच्या सण परंपरा तर सर्वच जपतात परंतु हिंदू प्रमाणेच सर्वच सण आणि उत्सव साजरे करणारे सायखेडा येथील कै. हाजि ईस्माईल शेख व  ग्रामपालीका स्थापनेतील माजी सरपंच स्वर्गीय इब्राहिम शेख यांनी आपल कुटुंब व परिसरात सर्व धर्मियांप्रमाणेच धार्मिक कार्यक्रम व श्रध्दा यातुन पुढील पिढ्यातही साजरे करण्याची परंपरा सुरू केली ती आजही त्यांचा वारसा चालवत आहे. 

आजही त्यांचा वारसा कायम

आई वडिलांकडून मिळालेली परंपरा आजही दिपावली लक्ष्मी पूजन अश्पाक शेख हे सामजिक कार्यकर्ते गेले ६५ वर्ष परंपरा जोपासत आहेत. दिपावलीच्या दिवसाची सुरवात सकाळी ते स्व.इब्राहिम शेठ शेख (वडीलांनी) यानी उभारलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदीर दर्शना पासून कुटूंबासह करतात. दसऱ्याला सर्व मंदीरे व देवस्थाने (मेनरोड) जाताना नारळ ठेऊन दर्शन घेतात. याच बरोबर दिपावली लक्ष्मीपूजन दसऱ्याला शस्त्र पूजन, पोळा सणाला स्वतःच्या शेतात जाऊन गाय बैल पूजन करून बारस साजरी करतात, पाडव्याला भजन कीर्तनातही सहभाग व मंडळाच्या माध्यमातून आयोजन केले जाते.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

मोठ्यांचे मार्गदर्शन आदर्श डोळ्यासमोर 

गुढी पाडव्याला गुढी उभारणे, धामोरीची दिंडी त्रंबकेश्वर येथे जातांना सायखेडा येथे दिंडीचे आगमन झाल्यावर प्रतिवर्षी महाप्रसाद जेवण देवून अन्नदान करणे. रमजान बकरी ईद मोहरम यामधे भाऊ व मुलांसह मुस्लिम समाजाच्या कार्यात ही भाग घेणे, स्वतः रक्त दान शिबिर घेणे, नवरात्र घट स्थापना गणपती स्थापना,.भजन कीर्तन आजोबा वडिल याचे मार्गदर्शन आदर्श डोळ्यासमोर ठेवून बारा वर्षानंतर येणाऱ्या सिंहस्थात सायखेडा देवी मंदीर स्वच्छता, महंताचे दर्शन स्वागत गावतील प्रत्येक सर्व धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

प्रत्येक सणांमध्ये सहभाग

आसद शेख, आसिफ शेख, आर्श शेख, साहील शेख, तौसिफ शेख, शाहरूख शेख , पप्पू शेख, समिना शेख, अशपाक शेख, मेहमूद शेख, फिरोज शेख, आसिफ शेख, तोसिफ शेख, असद शेख, पप्पू शेख, शाहरुख शेख, अर्श शेख, साहिल शेख तसेच शेख,पटेल, पठान, आत्तार, सय्यद ,कादरी, शहा, मन्सुरी या मुस्लिम कुटुंबातील सर्वांचा प्रत्येक सणांमध्ये सहभाग असतो. 

 

 महाराष्ट्राचे दैवत आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज मोहंमद पैगंबर यांचे महंत मौलवी याचे विचार प्रेरणा घेउन पुढच्या काळातही आई वडलांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन धार्मिक श्रध्दा जोपासत समाज सेवा करुन सर्व मित्रपरिवार शेतकरी नागरिक कष्टकरी जनतेच्या हिन्दुस्तानच्या पवित्र मातीची सर्वांच्या सोबत सेवा भक्ती भावाने करत राहू.-अश्पाक शेख, सामाजिक कार्यकर्ता सायखेडा