50 फुट खोल विहिरीत आढळली कार आणि त्यामागचे रहस्य! आढळल्या धक्कादायक गोष्टी

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पांगरी पंचाळे रस्त्यावर पंचाळे शिवारात सुधाकर बेदरकर यांच्या विहिरीत आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पाण्यात पडलेली कार आढळली. याबाबत बेदरकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी धावले. तपासणी करताच धक्कादायक गोष्टी आढळल्या.

 50 फूट खोल विहीरीत पडलेली कार आणि त्याचे रहस्य

सिन्नर तालुक्यातील पांगरी पंचाळे रस्त्यावर पंचाळे शिवारात सुधाकर बेदरकर यांच्या विहिरीत आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पाण्यात पडलेली कार आढळली. याची चौकशी केली असताच mp09 cr6594 ही राखाडी रंगाची स्विफ्ट कार दोन महिन्यांपूर्वी पाण्यात पडली असावी असा अंदाज आहे. पोलीस आल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. तेव्हा कारमध्ये केवळ हाडे शिल्लक असलेला एक मृतदेह आढळून आला. तसेच कारचे डाव्या बाजूचे पुढचे टायर फुटले होते. कदाचित टायर फुटून कार विहिरीत पडली असावी. रात्रीच्या वेळेस हा अपघात घडला असेल तर तो कुणाच्या लक्षात आला नाही.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

अशी पटली मृताची ओळख..

विहीर पन्नास फूट खोल असून त्यात 20 फूट पाणी आहे, विहीरीतून  स्विफ्ट कार जेव्हा पाण्याबाहेर काढली तेव्हा फक्त हाडे असलेला सापळा आढळून आला. त्यामुळे पोलिसांसमोर मृतांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान होते . मात्र , मृतदेहाची तपासणी केल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या आधार कार्ड वरून त्यांची ओळख पटवणे सोपे झाले. संजय तुळशीराम आहिरे (वय 40 ) राहणार जय भवानी रोड, नाशिक रोड असे मृताचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथील रहिवासी आहे.

पुणे पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद..

गेल्या काही महिन्यांपासून संजय हा खाजगी वाहनावर चालक म्हणून पुण्यात काम करत होता. इंदूर येथील एका उद्योजकाकडे तो कामाला होता. सदर उद्योजकाचा मुलगा पुण्यात आयटी इंजिनियर असून त्याच्या सांगण्यावरून तो दोन महिन्यांपूर्वी अपघात ग्रस्त कार घेऊन इंदोर कडे निघाला होता. संगमनेरहून पांगरी मार्गे तो लासलगाव कडे जात असताना अपघात होऊन कार विहिरीमध्ये पडली. संजय अहिरे बेपत्ता असल्याची नोंद पुणे शहर पोलिसात दाखल आहे.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल