नागरिकांनो, पोलिस तक्रारी टाळताय? ‘या’ नंबरवर थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी करा संपर्क

नाशिक : ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरातील नागरिकांसाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. कुणाचीही तक्रार असल्यास आणि स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जात नसल्यास थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

नागरिकांनो, थेट संपर्क करा...

नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असून, गुजरात राज्याला लागून सीमावर्ती व दुर्गम भागात अनेकदा पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांना दरवेळी नाशिकला आडगावला येऊन तक्रारी करणे शक्य नसल्याने पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वतःसह जिल्ह्यातील सगळ्या उपविभागीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. त्यानुसार तक्रारी स्थानिक पातळीवर दाखल करून न घेतल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील - ७७३८६००००१

अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर - ८८८८८००८०९

अपर अधीक्षक चंद्रकांत खांडवी - ९८२२६३४५००

ग्रामीण नियंत्रण कक्ष व्हॉट्सॲप - ९१६८५५११००

उपविभागीय अधिकारी मोबाईल
 
उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले - ८३९००२६५४९

भीमाशंकर ढोले (पेठ-कळवण) - ९८६७७९७७३२

निफाड विभाग, सोमनाथ तांबे - ९८८११७६१११

मनमाड विभाग, समीरसिंग साळवे - ९१४५११९०४९

मालेगाव विभाग, शशिकांत शिंदे - ९७६४८९६९१४

मालेगाव शहर कॅम्प, मंगेश चव्हाण - ९८२३९४०९५१

मुख्यालय श्यामकुमार निपुंगे - ९००४८५९००२