ह्रदयद्रावक! वृद्धापकाळात काठी असलेल्या ‘शुभम’लाच वडिलांनी दिला मुखाग्नी; घटनेमुळे परिसरात हळहळ

नाशिक / म्हसरूळ : शुभम शिक्षण घेत असताना वडिलांना आर्थिक हातभारही लावत होता. वृद्धापकाळात मुलगा वडिलांची काठी होता. परंतु, ऐन तारुण्यात आलेल्या होतकरू मुलाच्या जाण्याने वडील प्रकाश सूर्यवशी यांना फार मोठा धक्का बसला आहे. काय घडले नेमके?

एक नियतीचा घाला आणि सर्वकाही उध्वस्त
मृत शुभम अतिशय कष्टाळू होता. त्याचे वडील गॅरेजमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आई नसल्याने त्याच्या आत्याने त्याला वाढविले होते. शुभम दहावीपासूनच मिळेल ते काम करून शिक्षण घेत होता. यापूर्वी काही काळ त्याने चपलांच्या दुकानातही काम केले होते. सध्या वेल्डिंगचे काम करून तो आयटीआयला शिक्षण घेत होता. शुभम राहत असलेल्या बिल्डिंगलगत पाणीपुरवठ्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यानच ही भिंत अर्धवट तुटलेली असल्याचे नागरिकांनी सांगितले. हीच भिंत चार दिवसांपूर्वी शुभमच्या पायावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊन तो घरी परतणार होता. परंतु त्याचा मृत्यू झाला. गणेशवाडी परिसरातील अमरधाम रस्त्यावर असलेल्या हरिकृष्ण सोसायटीजवळ बुधवारी (ता.२) दुपारी अर्धवट तुटलेली भिंत पायावर पडल्याने जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी (ता.३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभम प्रकाश सूर्यवंशी असे मृताचे नाव आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

ऐन तारुण्यात होतकरू मुलाचा मृत्यू
शुभम शिक्षण घेत असताना वडिलांना आर्थिक हातभारही लावत होता. वृद्धापकाळात मुलगा वडिलांची काठी होतो. परंतु, ऐन तारुण्यात आलेल्या होतकरू मुलाचा मृत्यू झाल्याने वडील प्रकाश सूर्यवशी यांना फार मोठा धक्का बसला आहे. शुभमला एक बहीण असून, भावाच्या अशा अचानक जाण्याने तीही खचली आहे. मित्रांमध्येही शुभम अत्यंत प्रिय असल्याने त्यांनाही अश्रू आवरत नव्हते.  

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच