लॉकडाउन काळात देवदूतासारखा धावला ‘मराठी तरूण उद्योजक’! बेरोजगारांच्या हाताला मिळवून दिला रोजगार

सिडको (नाशिक) : लॉकडाउनच्या बिकट परिस्थितीत नाशिकमधल एका मराठी तरुणाने सॉफ्टवेअर कंपनीद्वारे सरकारचा ‘वर्क फ्रॉम होम’ हा उपक्रम हाती घेत अनेक बेरोजगारांच्या हाताला रोजगार व त्यांच्या घराला आर्थिक हातभार लावण्याचे काम करत तब्बल दोन कोटी रुपयांची उलाढाल केली. 

लॉकडाउन काळात रोजगार देणारा उद्योजक
तरुण उद्योजक धडपड्या तरुण म्हणजे महेंद्र टेक्नो सॉफ्ट कंपनीचा मालक महेंद्र निकम होय. पंचविसाव्या वर्षी त्याने सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. या लॉकडाउनच्या काळात त्याने अभ्यास करून सर्वसामान्य कामगारांना साधे, सोपे व सहज रोजगार मिळवून देता येईल असे कंटेन्ट असलेला व्हिडिओ एडिटिंगचा प्रोजेक्ट घेत तरुण-तरुणींना काम करू शकतील असा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. या सर्वांतून जवळपास दोन कोटी आणि त्याहून जास्त किमतीची उलाढाल झाली. या सर्व प्रोजेक्टची सगळ्यात जास्त मदत ही महिला वर्गाला करून या कंपनीने अप्रत्यक्षरीत्या महिला सबलीकरण या गोष्टीला पाठिंबा देत सरकारचा उद्देश काहीअंशी प्रत्यक्षात आणला. त्या बदल्यात त्यांना योग्य मोबदला पण मिळाला. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

समाजात एक आदर्श उद्योजक म्हणून उदयास
‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून काम करताना, त्याने ही कंपनी सुरू करताना कंपनीमध्ये काम करणारे कामगार हे घरी राहूनसुद्धा काम करू शकले पाहिजे हेच उद्दिष्ट नेमके लॉकडाउनच्या काळात सार्थ ठरले. अपयश पचवून स्वतःच्या पायावर उभा राहणारा हा ३० वर्षांचा तरुण समाजात एक आदर्श उद्योजक म्हणून उदयास येऊ पाहत आहे. या तरुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या अनेक तरुणांना आपल्या पायावर उभे राहून समाजोपयोगी कामे करण्याचा नक्की प्रयत्न करता येईल! 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​