गवत कापता कापता युवा शेतकऱ्याच्या हाती लागला ‘साप’! काही दिवसांपूर्वी बहिणीसोबतही घडली होती घटना

नांदगाव (जि.नाशिक) : शेताच्या बांधावर गेलेल्या तरुण शेतकऱ्याच्या हातातील गवताची मूठ सुटताच थेट मृत्यूचे दर्शन घडले आणि गणेशचा थरकाप उडाला. कारण काही दिवसांपूर्वी अशाच घटनेमुळे बहिण दगावली होती. या प्रसंगाची आठवण सर्वांना झाली.

गवत समजून हाती लागला मृत्यू

चिंचविहीर येथील गणेश तुरकुणे हा युवक जनावरांसाठी मंगळवारी (ता. १५) सायंकाळी चारा घेण्यासाठी शेतातील बांधावर गेला. वाळलेल्या गवताची कापणी करताना त्याच्या हातात विषारी साप आला. हातातील गवताची मूठ सुटताच काय चावले म्हणून साप दिसला आणि गणेशचा थरकाप उडाला. कारण काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाल्याने त्याची बहिण दगावली होती. या प्रसंगाची आठवण सर्वांना झाली.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

बहिणीसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण सर्वांना

जळगाव बुद्रुकचे सर्पमित्र प्रभाकर निकुंभ यांना बोलविले व त्यांच्या मदतीने नांदगाव येथे खासगी दवाखान्यात गणेशवर उपचार सुरू आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी साप आणि अंधश्रद्धा या विषयावर चिंचविहीर येथे प्रबोधन केले होते. त्याची आठवण ठेवत तुरकुणे परिवाराने रुग्णालय गाठून एका संकटातून सुटल्याची भावना या परिवाराने व्यक्त केली.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

तातडीने वैद्यकीय उपचार झाल्याने बचावला

शेतातील बांधावरचे गवत कापता कापता हातात चक्क साप आला. गवतासोबतच सापही कापला गेला. पण जखमी सापाने कडाकडून हाताला चावा घेतला अन् त्याच्या अंगाचा थरकापच उडाला. प्रसंगावधान राखत तातडीने वैद्यकीय उपचार करून घेतल्याने तोही बचावला आहे.