Accident : गरबा पाहायला निघालेल्या काका-पुतणीला दुचाकीची जोरदार धडक, पुतणी ठार

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा : 

गरबा नृत्य पाहायला निघालेल्या काका – पुतणी’ला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात, पुतणी ठार झाली असून काका गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

संक्रांती तारक्या देसाई (२० रा. नवापाडा व ह.मु नवापूर जि. नंदुरबार असे मयत तरूणीचे नाव आहे. काका कल्पेश चिमा देसाई (वय २२ रा. नवापाडा ह.मु जानकी नगर जि.नंदुरबार) यांच्या दुचाकीवर मागे बसून (क्र.एमएच १८ बीवाय ७८९३) नवापाडा येथे गरबा नृत्य पाहण्यासाठी जात होते. त्यादरम्यान नवापूर-पिंपळनेर रोडवरील चरणमाळ ते गव्हाणीपाडा दरम्यान त्यांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने (क्र.एमएच १६ सीई ७२१० जोरदार धडक दिली. त्यात संक्राती हिच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याने ती ठार झाली.

यात कल्पेश हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार पसार झाला. या संदर्भात हरिष पाडव्या देसाई (वय ३५ रा. नवापाडा,अंबुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारणीभूत अपघातास ठरल्याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि.सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. चौधरी करीत आहेत.

हेही वाचा :

The post Accident : गरबा पाहायला निघालेल्या काका-पुतणीला दुचाकीची जोरदार धडक, पुतणी ठार appeared first on पुढारी.