Accident : पाचोरा तालुक्यात बसची ट्रकला धडक, १३ विद्यार्थी जखमी

बसची ट्रकला धडक,www.pudhari.news

जळगाव : भरधाव बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना आज (१८ जुलै) सकाळी सव्वासहा वाजेच्‍या सुमारास पाचोरा तालुक्यात (Jalgaon Accident)  घडली आहे. बसचालकासह २० प्रवासी जखमी झाले असून, यात १३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोसला ते पाचोरा ही बस पाचोऱ्याकडे येत होती. सकाळी सव्वा सहाचे सुमारास पाचोरा शहराजवळ समोरून येणाऱ्या ट्रकवर बस समोरासमोर धडकली. या बसमध्ये मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे या अपघातात १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. एकूण २० प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jalgaon Accident )

जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे

स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमित नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पूजा मनगटे प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड व दिनेश चव्हाण हे विद्यार्थी जखमी झाले आहेत.

The post Accident : पाचोरा तालुक्यात बसची ट्रकला धडक, १३ विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.