Accident : राज्यात ७१ हजार जणांचा रस्ते अपघातांत मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात जानेवारी २०१८ ते एप्रिल २०२३ या सव्वापाच वर्षांच्या कालावधीत १ लाख ६७ हजार ७०० रस्ते अपघातांमध्ये(Accident) ७१ हजार ३१९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक दुचाकीचालकांचा समावेश असून, पादचाऱ्यांच्या मृत्यूचेही प्रमाण लक्षणीय आहे. सर्वाधिक १५ हजार २२४ अपघाती मृत्यू २०२२ साली झाले आहेत.

राज्यात दळणवळणासाठी आजही रस्ते मार्गांचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे राज्यात रस्त्यांचे जाळे वाढले असून, त्यात दरवर्षी भर पडत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल बांधण्याकडे कल वाढला आहे. मात्र याचबरोबर अपघातांचे व अपघाती मृत्यूंचेही प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती, बेशिस्त चालकांवर कारवाई, अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधून त्यावरील उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक अपघाती (Accident) मृत्यू झाला आहे.

राज्यातील रस्त्यांचे जाळे (कंसात अंतर किलोमीटरमध्ये)

राष्ट्रीय महामार्ग (१८,३८१)

राज्य महामार्ग (३१,९७६)

समृद्धी एक्स्प्रेस महामार्ग (७०१)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग (९४.५०)

जिल्हा मार्ग (२,७३,०४९)

जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२३ महामार्गांवरील अपघाती मृत्यू

एक्स्प्रेस वे — २०२

राष्ट्रीय महामार्ग — १०,५९६

राज्य महामार्ग — ८,३११

इतर रस्ते — १४,५६५

————

वर्षनिहाय अपघात व अपघाती मृत्यू

वर्ष — अपघात — अपघाती मृत्यू

२०१८ — ३५,७१७ — १३,२६१

२०१९ — ३२,९२५ — १२,७८८

२०२० — २४,९७१ — ११,५९६

२०२१ — २९,४७७ — १३,५२८

२०२२ — ३३,३८३ — १५,२२४

२०२३ (एप्रिल अखेर) — ११,२२७ — ४,९२२

हेही वाचा :

The post Accident : राज्यात ७१ हजार जणांचा रस्ते अपघातांत मृत्यू appeared first on पुढारी.