Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ

आदित्य ठाकरे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंगळवारी (दि. 9) जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघांत हा कार्यक्रम होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. या आमदारांनी शिंदे गटाकडे धाव घेतली असली, तरी पदाधिकारी पक्षासोबत कायम आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी ‘मातोश्री’वर भेट दिली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केले होते. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही या पदाधिकार्‍यांनी दिली होती. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी 10.15 वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल. तिथून पाचोर्‍याकडे प्रयाण. सकाळी 11.20 वाजता पाचोरा येथे संवाद साधणार. दुपारी 12.15 वाजता पाचोरा येथून धरणगावकडे प्रयाण. धरणगावला दुपारी 1.45 वाजता संवाद साधतील. दुपारी 2.15 वाजता धरणगाव येथून पारोळाकडे प्रयाण व दुपारी 3 वाजता पारोळा येथे संवाद साधतील. दुपारी 3.30 वाजता पारोळा येथून धुळ्याकडे प्रयाण करणार.

हेही वाचा :

The post Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ appeared first on पुढारी.