Aditya Thackeray : नाशिकरोडला सोमवारी आदित्य ठाकरेंची सभा

Aaditya Thackeray News

नाशिकरोड : शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची जाहीर सभा सोमवारी (दि. ६) सायंकाळी 6 ला नाशिकरोडच्या आनंद ऋषीजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात होणार आहे, अशी माहिती सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

नाशिकरोड येथे पक्ष कार्यालयात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी माजी महापौर नयना घोलप, माजी नगरसेविका रंजना बोराडे, मंगला आढाव, सुनीता कोठुळे, संतोष साळवे, प्रशांत दिवे तसेच योगेश देशमुख, नितीन चिडे, भय्या मणियार, जयंत गाडेकर, योगेश गाडेकर, गणेश गडाख, मसूद जिलानी, सागर भोजने, राहुल बोराडे, शिवा गाडे, योगिता गायकवाड, पद‌्मा थोरात, सीमा डावखर, गायत्री पगार, सागर कोकणे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

सभेच्या आयोजनासाठी बैठका घेण्याची सूचना करून गायकवाड यांनी जबाबदारीचे वाटप केले. सोमवारच्या सभेला माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेते विलास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा : 

The post Aditya Thackeray : नाशिकरोडला सोमवारी आदित्य ठाकरेंची सभा appeared first on पुढारी.