Aditya Thackeray : शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ हरवलाय

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडी काळातील मदत शेतकऱ्यांना आता मिळत नाही. कृषिमंत्री कोण आहेत ते लोकांना बघायला मिळत नाही. जिल्ह्यात युवकांना नोकरी नाही. उद्योग गुजरातला जात आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असून, राज्यात कर्जमुक्ती नाही. गद्दारांच्या सत्तेत रोजगार नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ हरवला असल्याचा घणाघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी येथील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात केले.

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अनिल कदम, जयंत दिंडे, सुनील बागूल, संभाजी पवार, शिवा सुरासे, निवृत्ती जगताप उपस्थित होते. गुवाहाटीत जाऊन आलेले चाळीस गद्दार फौजफाटा घेऊन फिरत आहेत. यांच्यात दम असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचे आवाहन ठाकरे यांनी दिले. गद्दारांकडे मोठी यंत्रणा असतानाही मी वरळीच काय ठाण्यातूनही निवडणूक लढायला तयार असल्याचे ठाकरे यांनी विरोधकांना प्रतिआव्हान दिले. याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवा कार्यकर्त्यांचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मेळाव्यास उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, विंचूर शहराध्यक्ष नानासाहेब जेऊघाले, सरपंच सचिन दरेकर, नीलेश दरेकर, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर पवार, राजाराम दरेकर, फिरोज मोमीन, आत्माराम दरेकर, किशोर दरेकर, प्रकाश पाटील, गोपीनाथ ठुबे, भय्यासाहेब देशमुख, प्रवीण सालगुडे, डॉ. सुजित गुंजाळ, विलास कांगणे, निवृत्ती जगताप यांसह निफाड, येवला तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Aditya Thackeray : शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ हरवलाय appeared first on पुढारी.