Amit Thackeray : राज ठाकरे देतील ती जबाबदारी स्वीकारायला तयार, अमित ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

<p>राज ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडायला तयार आहे, अशा शब्दांत मनसे नेते अमित ठाकरे यांनी नव्या जबाबदारीचे संकेत दिले. मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनविसेच्या अध्यक्षपदाची धुरा अमित ठाकरेंवर दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अमित ठाकरेंनी नाशिकमध्ये सूचक वक्तव्य केलं. मनसे हा पक्ष राज ठाकरेंच्या जीवावर आणि नावावर चालतो. कुणी गेल्यानं काही फरक पडत नाही, असं अमित ठाकरे म्हणालेत.</p>