Ashadhi Wari 2022 : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी आज (13 जून) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरापासून सकाळी दहा वाजता पालखी मार्गस्थ होणार आहे. त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेऊन गाव प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात असेल. या दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून 46 दिंड्या सहभागी होणार आहेत. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली दोन वर्ष पायी वारीवर शासनाने निर्बंध घातल्याने शिवशाही बसने फक्त मानकऱ्यांसह 25 वारकरी पंढरपूरकडे रवाना होत होते. यामुळे वारकऱ्यांचा हिरमोडही झाला होता. यंदा मात्र पायी दिंडीला परवानगी देण्यात आल्याने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कालपासूनच मोठ्या संख्यने वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, कधी एकदा विठूरायाचं दर्शन घेता येईल याचीच वाट ते बघत आहेत.

याआधी 6 जून रोजी गजानन महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं होतं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा झाला होताा. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? तसेच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा कधी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

संत गजानन महाराजांची पालखी मालेगांवच्या शिरपूर मुक्कामी
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी समजल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं रविवारी (12 जून) सकाळी 10 वाजता वाशिम जिल्ह्यात आगमन झालं. 6 जूनला शेगाव इथून निघालेल्या या पालखीचे अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रस्थान झालं. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केलं. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीचा मुक्काम श्रीक्षेत्र डव्हा नंगेनाथ महाराज यांच्या मंदिरास्थळी होता. आज पालखी वाशिम इथल्या मालेगांवच्या शिरपूर मुक्कामी असणार आहे. त्यानंतर पालखी मजल दरमजल करत वाशिमच्या रिसोड मार्गे हिंगोलीकडे रवाना होणार आहे.

माता रुक्मिणीच्या पालखीचं आज बारालिंग मंदिरातून प्रस्थान
माता रुक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर इथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार रविवारी (12 जून) सकाळी रामनाथ स्वामी संस्थान, धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशिम इथून पालखीचं प्रस्थान झालं. तर रात्री बारालिंग मंदिर, (ता. कारंजा लाड, जिल्हा वाशिम) येथे पालखीचा मुक्काम होता. आज म्हणजेच सोमवारी 13 जून रोजी ही पालखी सकाळी बारालिंग मंदिर, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशिम इथून प्रस्थान करेल. तर, रात्री पोघात, ता. मंगरुळ नाथ, जिल्हा वाशिम इथे पालखीचा मुक्काम असणार आहे.

संत मुक्ताईच्या पालखीचं बुलढाण्यातून प्रस्थान
संत मुक्ताई यांच्या पालखीचं रविवारी (12 जून) बुलढाण्यात आगमन झालं. तत्पूर्वी संत मुक्ताई पालखी राजूर घाटातून विठ्ठलाच्या नामजपात भर उन्हात आली. दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर मुक्ताईची पालखी बुलढाणा शहरात आल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. बुलढाण्यात जागोजागी पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं असून रात्री पालखीचा मुक्काम बुलढाणा इथे होता. तर, आज सकाळी ही पालखी बुलढाणा इथून प्रस्थान करुन रात्री येळगाव इथे पालखीचा मुक्काम असणार आहे.

संत रुपलाल महाराज पायी पालखीचे रथासह पंढरपूरसाठी प्रस्थान
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे "पुंडलिक वरदे हरि विठ्ठल......श्री ज्ञानदेव तुकाराम" संत रुपलाल महाराजांच्या जयघोषात संत रुपलाल महाराज पायी पालखी सोहळा अंजनगाव सुर्जी येथून पालखीने शुक्रवारी 10 जून रोजी सकाळी 9.30 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत रुपलाल महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपुरात असणार आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या संतांच्या पालख्यांमध्ये संत रुपलाल महाराज पालखी सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. कारण, पंढरपूरमध्ये लांब अंतरावरुन येणाऱ्या पालख्यांमधली ही एक पालखी आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी तब्बल 30 दिवस 750 किलोमीटरचा पायी प्रवास करतात. त्यामुळे इतर पालखी सोहळ्यांपेक्षा ही पालखी लवकर पंढरपूरकडे मार्गस्थ होते. या पालखी सोहळ्याच्या परंपरेला 27 वर्ष पूर्ण होत आहेत.

आगामी पालखी सोहळे :
20 जून : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
21 जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

संबंधित बातम्या :

Ashadhi Wari 2022 : संत गजानन महाराज पालखी आज श्री क्षेत्र डव्हा मुक्कामी; तर मुक्ताईच्या पालखीचा आज खंडाळा मकरध्वज येथे मुक्काम

Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज बुलढाणा मुक्कामी; तर गजानन महाराजांच्या पालखीचा अकोला येथे मुक्काम

गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; 700 भाविक 5 जिल्हे, 750 किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहचणार

Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज भालेगांव मुक्कामी; तर माता रूक्मिणीच्या पालखीचा कुऱ्हा येथे मुक्काम

Ashadhi Wari 2022 : गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; असा असेल पालखीचा मार्ग