ATS Raid : जळगावात एटीएसची कारवाई, एकजण ताब्यात

अटक www.pudhari.news

जळगाव : अकोला एटीएसच्या पथकाने जळगाव शहरात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास छापेमारी केली. यावेळी मेहरूण परिसरातून एकाला ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा खजिनदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. एका मशीद जवळ झोपलेले असतांना तिघांना ताब्यात घेण्यात आले. परंतू यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. जळगावच्या पोलीस सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बारामतीत पोळ्यावर निर्बंध

मुंबईत गुन्हा दाखल…
ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसापासून जळगावात लपून बसलेला होता. त्याचे नाव अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय 32 वर्षे, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. एवढेच नव्हे तर हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा :

The post ATS Raid : जळगावात एटीएसची कारवाई, एकजण ताब्यात appeared first on पुढारी.