Awake brain surgery : अवेक ब्रेन सर्जरी’द्वारे मेंदूच्या गाठीची शस्त्रक्रिया

अवेक ब्रेन सर्जरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका ५८ वर्षीय रुग्णाच्या मेंदूतील ट्युमरवर तीन अत्याधुनिक वैद्यकीय प्रणाली वापरून यशस्वी शस्त्रक्रिया (Awake brain surgery) करण्यात मेंदूविकार तज्ज्ञ आणि मणक्यांचे सर्जन डॉ. राहुल बिर्ला यांना यश आले. रुग्ण शुद्धीवर असताना शरीराच्या हालचाली सामान्यपणे करत कुठेही गुंतागुंत होणार नाही, यावर लक्ष ठेवून ही शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले.

रुग्णाला शरीरातील उजव्या बाजूस अशक्तपणा तसेच वरील अंगात मुंग्या येणे, डोकेदुखीची समस्या होती. त्यांचे सिटीस्कॅन, एमआरआय केले असता त्यांच्या डाव्या मेंदूमध्ये गाठ (ट्युमर) असल्याचे निदान डॉ. बिर्ला यांनी करून मेंदूतील ट्युमर काढण्याचा निर्णय घेतला. रुग्ण शुद्धीवर असताना मेंदूतील ट्युमर काढण्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते, कारण ती शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या हात-पायांसह सर्व शरीराच्या हालचाली सामान्यपणे होत आहेत ना? हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. डॉक्टरांनी रुग्णाच्या कवटीच्या हाडांना छेद देऊन रुग्ण शुद्धीवर ठेवून त्या अवस्थेत मेंदूची शस्त्रक्रिया (अवेक क्रॅनिओटॉमी) ही पद्धती वापरली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण डॉक्टर व्यवस्थित, छान बोलतही होता, हे विशेष! अशी क्लिष्ट शस्त्रक्रिया केवळ अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतात. (Awake brain surgery)

हे कामही डॉ. राहुल बिर्ला यांनी लीलया यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. अनुप डांगे आणि डॉ. सरला सोहंदाणी यांनी सहकार्य केले. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आशेचा किरण मिळाल्याची भावना मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मनोज चोपडा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

The post Awake brain surgery : अवेक ब्रेन सर्जरी'द्वारे मेंदूच्या गाठीची शस्त्रक्रिया appeared first on पुढारी.