प्रा. धूत यांच्या ‘प्रचालन तंत्र’ पुस्तकास पुरस्कार.

के. के. वाघ तंत्रनिकेतन (K K Wagh Polytechnic Nashik), नाशिक येथे माहिती तंत्रज्ञान(IT) या विभागात व्याख्याता या पदावर कार्यरत असणारे श्री. सुयोग सुभाषचंद्र धूत यांना ” हिंदी में तकनीकी एवं प्रबंधन विषयों पर लिखी गई पांडुलिपियो के प्रकाशन हेतू वित्तीय सहायता योजना ” या योजने अंतर्गत लिहलेल्या “प्रचालन तंत्र ” या पुस्तकास अखिल भारतीय तंत्रशिक्षण शिक्षा परिषद , नवी दिल्ली या संस्थेद्वारा पुरस्कार प्राप्त झाला.

१० नोव्हेंबर २०२० रोजी  अखिल भारतीय तंत्रशिक्षण शिक्षा परिषद , नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात माननीय केंद्रीय शिक्षा राज्य मंत्री श्री. संजयजी धोत्रे , AICTE अध्यक्ष्य श्री. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते शाल , प्रमाणपत्र व दिड लाखाचा धनादेश देऊन प्राध्यापक धूत यांचा सन्मान करण्यात आला.  

माननीय महसूल मंत्री श्री. बाळासाहेबजी थोरात , आमदार श्री. सुधीरजी तांबे तसेच आमदार श्री. हिरामनजी खोसकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला . प्राध्यापक धूत याना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply