Bakri-Eid 2021: आज देशभरात कोरोनाच्या सावटात बकरी ईद; मालेगावात घरात राहून बकरी ईद साजरी

<p>&nbsp;आज देशभरात बकरी ईद साजरी केली जातीये. मात्र सलग दुसऱ्या वर्षी ईदवर कोरोनाचं सावट कायम आहे. त्यामुळे देशभरात साधेपणाने ईद साजरी केली जातीये. बकरी ईदकरिता मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केलीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मैदानावर होणारी सामुदायिक नमाज पठाणाला प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलीये. रमजाननंतर बकरी ईद हा सर्वात मोठा सण मानला जातो. तरी, आज देशातील महत्वाच्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण केलं जातंय.</p> <p>देशभरात दरवर्षी उत्साहात साजरी होणाऱ्या बकरी ईदच्या सणावर यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी घरी थांबून ईद साजरी करावी असं प्रशासनानं आवाहन केलंय. त्याला मालेगाव मध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. &nbsp;दरवर्षी मुख्य ईदगाह मैदानावर होणारी सामूहिक नमाज पठणाची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे. ईदगाह मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेय तर पोलीस बंदोबस्त तेथे लावण्यात आलाय.</p>