गरजू कर्जदारांना विनातारणाच्या नावाने लाखो रुपयांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – गरजू कर्जदारांना विनातारण, विना जामीनदार व सीबिल न तपासता कर्ज देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या हाक मराठी अर्बन निधी लि. बँकेच्या मुख्य संशयितास शहर पोलिसांनी अटक केली आहे. भूषण सुरेश वाघ (३१, रा. डीजीपीनगर २, नाशिक, मूळ रा. ता. सिंधखेडा, जि. धुळे) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. भूषण वाघ याने …

बोगस शिक्षक मतदारांवर गुन्हे दाखल करा: संजय राऊत

सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – बोगस शिक्षक मतदार शोधून त्यांच्यावर तसेच मुख्याध्यापक, संस्थाचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या माजी शिक्षक आमदारांवर जोरदार टीका केली. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड संदिप गुळवे यांच्या प्रचारार्थ आयोजित …

शिक्षकांना बाजारात उभे करू नका; मुख्यमंत्र्यांना राऊतांचा टोला

सिडको  (नाशिक): पुढारी वृत्तसेवा –  महाराष्ट्राला शिक्षण आणि शिक्षकी पेशाची मोठी परंपरा आहे. मुख्यमंत्री जर शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावत असतील, तर आपल्या परंपरेला मोठा तडा जाताना दिसतोय. महाराष्ट्रावरील संस्कारांची थोडी जरी जाण असेल, तर शिक्षकांना या बाजारात उभे करू नका, असा जोरदार टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना …

‘काय सफारी, काय नथ, काय पैठणी ओक्केमधी हाय सगळं’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये उमेदवारांकडून मतदार शिक्षकांना पैठणी, सफारी ड्रेस यासह सोन्याच्या नथींचे वाटप करण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘काय सफारी, काय नथ, काय पैठणी ओक्केमधी हाय सगळं’ अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. २६) मतदान होत आहे. …

आक्षेपार्ह पत्रके वाटून समाजामध्ये तेढ निर्माण करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दोन समाजांंत तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले पत्रक छापून पंचवटी परिसरातील राजवाडा भागातील घरांमध्ये वाटप करणाऱ्या संशयित अमोल चंद्रकांत सोनवणे (३७, रा. पंचवटी) याला न्यायालयाने गुरुवार (दि. २७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आक्षेपार्ह पत्रक संशयिताने स्वत: लिहिले असून, त्यानेच ते छापल्याचे समोर येत आहे. पंचवटी परिसरात शनिवारी …

रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लागणार : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील रेल्वेबाबत असलेल्या प्रश्नांवर भुसावळ डी आर एम यांच्या कार्यालयात शनिवार (दि.२२) रोजी जिल्ह्यातील नामदार व आमदार यांच्या उपस्थितीत चर्चा  पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न येत्या दोन-तीन महिन्यात मार्गी लागणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, …

जनस्थान फेस्टीव्हल; गप्पा कलावंतासोबत ‘एआय’चा सूर

नाशिक, पुढारी वृत्तसेवा – कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे सर्व क्षेत्र व्यापले आहेत. त्याचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रातही होणार आहे. तरीही मानवाच्या मनातून प्रगटल्या भावना, सर्जनशीलता आणि अभिनवता कृत्रिम बुद्धीमत्तेपेक्षा नक्कीच वरचढ, श्रेष्ठ अन् अव्दितीय राहणार असल्याचा सूर जनस्थान फेस्टीव्हलच्या कलावंताशी गप्पा या चर्चासत्रात उमटला. जनस्थानच्या वर्धपनदिनानिमित्त सुरु असलेल्या जनस्थान फेस्टव्हीलमध्ये बुधवारी(दि.१९) कलावंतांशी गप्पा हा चर्चात्मक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये …

नाशिक महापालिकेकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन

नाशिक: पुढारी वृत्तसेवा – ई-कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेवर बंधनकारक असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन महापालिकेकडून केले जात असल्याचे समोर आले आहे. घनकचरा व पर्यावरण विभागाच्या टोलवाटोलवीत ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याने महापालिकेवरच आता कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक शहरातही ई-कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. घनकचऱ्यासोबतच नादुरुस्त फ्रीज, टीव्ही, संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा …

नाफेडची कांदा खरेदी बंद करा: कांदा उत्पादक शेतकरी संघटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शेतकरी उत्पादक कंपन्यांसह अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी मान्य केल्याने आता या गैरप्रकाराची सखोल चौकशी होईपर्यंत नााफेडची कांदा खरेदी बंद करण्यात यावी, अशी मागणी कांदा …

१७ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने नागरिकांचा संताप

मनमाड (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – शहरातून जाणाऱ्या पुणे – इंदूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून हा महामार्ग वाहनधारक आणि नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी या मार्गावर दुचाकीवरून जाताना कंटेनरखाली सापडून १७वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईक आणि नागरिकांनी शनिवारी (दि. २२) इंदूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस प्रशासनाने …