निवृत्तिनाथ महाराज पालखीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी (दि. २२) नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी आषाढी वारीनिमित्त त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पालखीपूजन करून आरती केली. त्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज विश्वस्त ट्रस्टकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या समवेत पालकमंत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा …