BREAKING : अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण; जम्मू काश्मीरमध्ये देशसेवा करताना शहीद

नांदगाव (जि.नाशिक) :  जम्मु येथे रात्री नऊच्या वेळी डोंगरावर गस्त घालतांना लष्करी जवान सुरेश घुगे यांचा पाय घसरुन ते कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.मेंदूला दुखापत झाली. लष्करी इस्पितळात शर्थीचे वैद्यकिय उपचार झाले होते. मात्र दुर्दैवाने यात त्यांना वीरमरण आले. खराब हवामानामुळे विमानाने त्यांचे पार्थिव आणतांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याबाबत अधिकृतपणे निर्णय तेथील लष्करी अधिकारी घेणार आहेत. याबाबतीत नातेवाईकांना पहाटे दूरध्वनीवरुन माहिती कळविण्यात आली.पंचक्रोषीतल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी अस्तगावला त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे.(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)