BREAKING : चांदवडच्या कोविड सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

चांदवड (जि.नाशिक) : चांदवडला नव्यानेच सुरू झालेल्या कोविड सेंटर बिल्डिंगला भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे समजते. याठिकाणी सेंटरच्या खाली फर्निचरचे भले मोठे गोडावून तसेच येथील रन वे हॉटेल ला देखील या आगीचा विळखा पडला आहे. हे खाजगी  कोविड सेंटर असून घटनास्थळी मालेगाव, पिंपळगाव , चांदवड अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या खाजगी कोविड सेंटरचे आजच उदघाटन होते. अशातच ही भीषण आग लागलीय (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी