BREAKING : डॉ. अशोक थोरात नाशिकचे नवे प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक

नाशिक : बीड जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांची शासनाने नाशिकचे प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी आज (ता.८) पदभार स्वीकारला.

डॉ. थोरात नाशिकचे प्रभारी जिल्हाशल्यचिकीत्सक

बीडमध्ये 3 वर्षांहून अधिक काळ जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणून काम केलेल्या डॉ. थोरात यांच्या जागी डॉ. सुर्यकांत गित्ते यांची ता. २६ नोव्हेंबरला नेमणूक झाली होती. चार महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यांना नवीन नियुक्ती मिळाली नव्हती. दरम्यान, नाशिकच्या जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याने सदर पद रिक्त होते. या पदावर डॉ. थोरात यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.  

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

बीडमध्ये 3 वर्षांहून अधिक काळ जिल्हा शल्यचिकीत्सक
त्यांच्या कार्यकाळात बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेने अनेक सामान्यपयोगी उपक्रम राबविले. खासगी स्त्री रोग तज्ज्ञांच्या मदतीने गर्भवतींच्या तपासणीत बीड जिल्हा देशात अव्वल राहीला. तत्कालिन मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते डॉ. थोरात यांचा गौरव झाला होता. डॉ. थोरात यांनी स्वत: ४२०० शस्त्रक्रीया केल्या होत्या. कुटुंब नियोजन, मोतीबिंदू शस्त्रक्रीयांत   बीड जिल्हा अव्वल राहीला, कायाकल्प अंतर्गत नऊ संस्थांना पुरस्कार मिळाले, शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसूतीच्या टक्केवारीत पंचावन्न वरून पंच्याऐंशी टक्के वाढ झाली होती.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश