नाशिक : शनिवारी (ता. 28) सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात जखमी झालेले नाशिकचे सुपुत्र आरपीएफ सहाय्यक कमांडर नितीन भालेराव यांचा आज रविवारी (ता. 29) मृत्यू झाला.
नाशिकचा सुपुत्र छत्तीसगढ शहीद
छत्तीसगढमधील रायपूरमध्ये झालेल्या माओवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नितीन भालेराव माओवादी हल्ल्यात शहीद झाले आहे. रायपूर येथील सुकमा ताडमेटलामध्ये माओवाद्यांनी IED स्फोट घडवला आहे. माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 10 जवान जखमी झाले आहे. या स्फोटात सहाय्यक कमांडेट नितीन भालेराव हे शहीद झाले. कोबरा बटालियन 206 चे अधिकारी असलेले नितीन भालेराव हे जवानासोबत अभियानावरुन परतत असताना गंभीर जखमी झाले होते. राञी हेलीकॉप्टरने उपचारासाठी रायपुरला हलवले त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शहीद नितीन भालेराव गेल्यावर्षी पास आऊट होऊन कोबरा बटालियनमध्ये दाखल झाले होते.
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार
त्यांचे पार्थिव रायपूरवरून विमानाने मुंबई येथे आणले जाईल. तेथून ते नाशिक येथे रवाना होईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाणार आहे.
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली