Breaking : नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला

नाशिक :  नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला. जिल्ह्यातील सिन्नर व मालेगावच्या सहा रुग्णांच्या नमुन्यांमध्ये पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत हा स्ट्रेन निष्पन्न झाला आहे. रुग्णांना या स्ट्रेनची लागण कशी झाली याची माहिती आरोग्य यंत्रणा घेत आहे. 

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना, देशासह महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच नाशिकमध्ये कोरोनाचा नवा युरोपियन स्ट्रेन आढळल्याने चिंता वाढली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..