BREAKING : नाशिकमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; सहाजण ताब्यात

नाशिक : नाशिकरोड परिसरातील सामनगाव रोड येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी (ता. १०) उघडकीस आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे.

 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)