BREAKING : नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू

नाशिक :  गुरूवारी (ता,२०) पुण्यात सिरम institute येथे भीषण अग्नितांडव पाहायला मिळाल्यानंतर नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर येतेय. नाशिक महानगपालिका राजीव गांधी भवन येथे आग लागली. ही आग सकाळी ११.३० च्या सुमारास लागल्याची माहिती मिळत आहे, आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्यापही मिळाली नाही. पण अग्निशमन दलाकडून आग वाचविण्याचे काम सुरू आहे.  (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

नाशिक महापालिकेच्या विरोधी पक्ष नेता कार्यालयाला शुक्रवारी दुपारी आग लागली. राजीव गांधी भवन मधील हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर आहे. या आगीमुळे महापालिकेच्या मुख्यालयात एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब  दाखल झाला असून आतापर्यंत जीवितहानी झाली नसल्याचे कळते.

 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा