BREAKING : ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : यंदा ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा सोमवारी (ता. २५) करण्यात आली. नाशिकमध्ये होणाऱ्या या साहित्य सोहळ्याच्या अध्यक्षपदानंतर सगळ्यांचे लक्ष स्वागताध्यक्षपदाकडे केंद्रित होते. स्वागताध्यक्षपदासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे आदींची नावे चर्चेत होते. अखेर चर्चेला पूर्णविराम लागला असून  स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

देशाचे खगोलशास्त्रज्ञ अन्‌ विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. बालाजी लॉन्समध्ये संमेलनाध्यक्षपदासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि घटक व संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत तासभर खल झाला. त्यानंतर संमेलनस्थळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील संमेलन कार्यालयात रविवारी (ता. 25) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या