Breast Cancer : नाशिक महापालिकेतर्फे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती

स्तनाचा कर्करोग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतर्फे स्तनाच्या कर्करोगाबाबत (Breast Cancer) जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त एचसीजी मानवता आणि वॉव ऑर्गनायझेशनतर्फे येत्या शनिवारी (दि.15) सायंकाळी 4 ते 8 या वेळेत ‘पिंक मेळा’ आयोजित करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिना हा ‘जागतिक स्तन कर्करोग जनजागृती’ (Breast Cancer) महिना म्हणून जाहीर करण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. डॉ. कुटे यांनी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे, उपाय, मासिक पाळीतील काळजी याबाबत माहिती दिली. याप्रसंगी एचसीजी मानवता आणि वॉव ऑर्गनायझेशनतर्फे उपस्थितांना कर्करोग तपासणीचे कुपन्स देण्यात आले.

संघटनेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या मेळाव्यात लाइव्ह बँड, सापशिडी, रिंग गेम्स, फ्ली मार्केट, प्रश्न-उत्तर असे विविध उपक्रम असतील. मेळाव्यानिमित्त ‘ऑनलाइन रांगोळी स्पर्धा’, ‘सेल्फी इन पिंक’ उपक्रमही आयोजित केले आहे. ‘सेल्फी इन पिंक’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपले छायाचित्र किंवा आपली मुलगी तसेच मैत्रिणींचे छायाचित्र काढून पाठवायचे आहे. फोटोसोबत कर्करोग जनजागृतीविषयी घोषवाक्य लिहून पाठविण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

The post Breast Cancer : नाशिक महापालिकेतर्फे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती appeared first on पुढारी.