Budget 2021 : नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी

नाशिक : राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 तयार झाली आहे. एकूण 1.10 लाख कोटी रुपयांचा बजेट रेल्वेसाठी आहे. भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन दिलं जाईल. यासाठी 18 हजार कोटी रुपये लागणार आहेत. आता मेट्रो लाईट आणण्यासाठी भर दिला जाणार आहे. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार असून नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली.

नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करणार का?

आज (ता.1) फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोनाच्या संकटातूनही तरुन जात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.