Budget 2021 : मुंबई-पुणेनंतर नाशिकच्या कनेक्टिव्हीटीला पूर्णत्व! अर्थसंकल्पातील नाशिकसाठी मेट्रो भेट

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पातील नाशिक मेट्रोच्या घोषणेमुळे नाशिकच्या सार्वजनिक वाहातूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. नाशिकच्या मेट्रोसाठी तरतूद आजच्या अर्थसंकल्पातील नाशिकसाठी भेट ठरली आहेच सोबतच, महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि नाशिक या सुर्वण त्रिकोणातील नाशिक शहरातील अंर्तंगत शहरी वाहातूकीच्या कनेक्टिव्हिटीला पूर्णत्व येणार आहे. सातपूर ते नाशिक रोड दरम्यानच्या सुमारे २२ किलोमीटर मार्गावर मेट्रो प्रस्तावित आहे. 

नाशिक शहराला मिळाली मेट्रो सेवेची भेट 

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी विविध तरतुदीची घोषणा करतांना सार्वजनिक वाहातूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १८ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील १ हजार ९२ कोटी नाशिकसाठी भेट ठरणार आहे. नाशिकच्या मेट्रो सेवेमुळे मुंबई - पुणे नाशिक राज्यातील सुर्वण त्रिकोणातील प्रमुख शहरापैकी नाशिक वगळता दोन्ही शहरांना मेट्रोची सेवा असली तरी, नाशिकला मात्र टायर मेट्रोची अनोखी योजना आखली आहे. देशातील पहिल्या टायरबेस मेट्रोबाबत कुतुहल आहे. आज त्यावर पडदा टाकतांना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २ हजार ९२ कोटीची तरतूद केली आहे. मुंबई पुण्यात तसेच उप राजधानी नागपूरला मेट्रोची सेवा सुरु असतांना आता नाशिकला मेट्रोचे भिजत पडलेले धोंगडे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

२२ किलोमीटरच्या मेट्रो 
राज्यातील प्रमुख शहरातील वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात नागपूर, कोचीन बंगळुरूसह नाशिकला मेट्रोची घोषणा केली. नाशिकच्या मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटीची तरतूदीची घोषणा केली आहे. शहरातील मेट्रोबाबत चर्चेला आर्थिक तरतूदीमुळे गती मिळणार आहे. टायर बेस मेट्रोमुळे शहरातील वाहातूक व्यवस्था बळकट होणार आहे.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

मेट्रोची घोषणा 
पहिल्यापासून चर्चेचा विषय राहिली आहे. पहिली टायरबेस मेट्रो असा उल्लेख होणाऱ्या देशातील पहिल्या वहिल्या टायरबेस मेट्रोचा प्रकल्प असणार कसा ? खरोखरच टायर बेस मेट्रो सुरु होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २ हजार ९२ कोटीची तरतूद करुन पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट सिटी अंर्तगत नाशिक रोड ते सातपूर दरम्यान सुमारे २२ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पामुळे अंर्तगत वाहतुकीला गती येणार आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

शंका आणि घोषणा 
महापालिकेत भाजपची सत्ता असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे दत्तकत्व घेतल्याची घोषणा केल्यानंतर नाशिकला काय दिले ? याविषयी वेळोवेळी शंका उपस्थित केल्या गेल्या. आजच्या घोषणेमुळे चर्चेतून कालबाह्य झालेल्या नाशिकच्या मेट्रो प्रकल्पाला पुन्हा गती येणार आहे.